तळवलकरांची मनमानी
हे असं का घडतं? तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून! असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......